एका स्वप्नाचं मरणं...
- त्या माणसाने कुरवाळलं नाही एखादंही सुगंधफूल,
की हुंगला नाही वळवानंतरच्या मातीचा सुवास...
खांदे झुकवून तो असाच दिशा नसलेल्या वाटा
तुडवत निघाला आहे,
त्याच्या स्वप्नातील देश शोधत.
‘बंद कमरेमें दम घुट रहा है, और खिडकियॉँ खोलता हूं तो जहरीली हवा आ रही है...’ मनाची अशी झालेली कुचंबणा आणि कुंठित अवस्था मुकाटपणे सहन करीत गेल्या अनेक वर्षांपासून तो समाजातल्या साºया मूल्यव्यवस्थेचा कोसळ अगतिकपणे बघत जगतो आहे. दारिद्र्यमुक्त देशाचे ते स्वप्न तो विद्यार्थीदशेत असतानाच कुणातरी शबनमवाल्यानं त्याला विकलं होतं. आणि आता मात्र मनाचा कोंडमारा सोसत सत्याच्या अधिक जवळ जाण्याची भाषा करीत तो, रानात मजुरीनं जाणाºया आपल्या बायकोला, लोकलढा समजावून सांगतो आहे. ‘वह सुबह कभी तो आयेगी’ च्या स्वप्नानं त्याचा पिच्छा अजूनही सोडलेला नाही. स्वत:ला दारिद्र्यविरोधी अभियान (भारत)चा मुख्य मार्गदर्शक म्हणविणाºया मराठवाड्यातील या मनस्वी आणि तरीही भोळ्या सामाजिक कार्यकर्त्याचं नाव आहे. - अभंग सूर्यवंशी. हा अभंग बोलतो छान. परिवर्तनाची राणा भीमदेवी भाषा करतो. पण ‘फिल्डींग’ लावायला जमलं नाही, म्हणून त्याला व्याख्यानाची निमंत्रणंही येत नाहीत. निदान ती देऊन तरी त्याला चार पैसे कडोसरीला लावता आले असते. आपल्या स्वप्नांबद्दल माझ्याशी कैकदा बोलताना अभंग म्हणतो, ‘गरीब माणसं काही स्वप्नं घेऊन जगतात. त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होतो. आम्ही जगण्याची स्वप्नं रंगवतो. त्यांचाही चुराडा होत चाललाय्. सगळी स्वप्नं मरून चाललीएत... सबसे खतरनाक होता है सपनोंका मर जाना... माणसाचं मरण एक दिवस रडवतं. पण स्वप्नांचं मरण आयुष्यभर रडवत राहतं...’
खेड्यापाड्यातल्या अशा कित्येक अभंगांच्या अनाथ कहाण्या अस्वस्थ करून टाकणाºया. मला भेटलेल्या अभंगाच्या हातात त्याच्या शाळकरी वयातच कुणीतरी परिवर्तन चळवळीचं हे बाहुलं दिलेलं. औषधांअभावी अभंगची आई १९७२ मध्ये गेली. ते दु:ख घेऊन ही तीन भावंडं जगण्याचा संघर्ष करीत होती. तशात १९८० च्या दरम्यान देशभर एनजीओंचं पेव फुटलं. अभंगनंही एक एनजीओ काढून सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. आयआयवायडब्ल्यू नागपूरच्या संस्थेत प्रशिक्षण घेतलं. एनजीओला फॉरेन फण्डस् मिळतात म्हणून ऐकलेलं. अभंग त्यासाठी प्रयत्न करू लागला. पत्रव्यवहाराचं भेंडोळं शबनममध्ये ठेऊन दर-दर भटकू लागला. आज ना उद्या मदत मिळेल म्हणून स्वप्न रंगवत दिवस काढत राहिला. त्याच दरम्यान कधीतरी तुळजापूरला ग्रंथालय अधिवेशन होतं. अभंग तिथं पोहोचला. तिथं निर्मलकुमार फडकुले, रत्नाप्पा कुंभार यांची ओळख झाली. यशदामध्ये महिला बचत गटांचं प्रशिक्षण घेतलं. दारिद्र्यमुक्त समाजाचं स्वप्न हाताशी आल्यासारखं त्याला वाटलं. अभंग उद्ध्वस्त होत गेला. उत्पन्नाचे सारे मार्ग बंद झाले. पदरमोड करायची. एका एकरातला माल झाला, की त्याचे पैसे घेऊन एनजीओ चालवायची. घरच्यांनी टाकून दिलं. भावांनी नातं तोडलं. गावानंही तेच केलं. कोणी एक रुपया देईना. सामाजिक कार्य करतो, कमाई काहीच नाही म्हणून गोतावळा दूर झाला. अभंग एकाकी झाला. एके दिवशी तर कहरच झाला. मुलं घरात रोटी-रोटी म्हणून रडत होती. घरात काहीच नाही म्हणून आयुष्यात पहिल्यांदाच मका चोरला. घरी आणून उकडून लेकरांना खाऊ घातला. ‘फकिरा’तला राणोजी आठवला. विष्णुपंत आठवले. विष्णुपंतांनी राणोजीला ‘तू जगलं पाहिजेस’ असं सांगितलेलं आठवलं. अभंगला जगण्याचं बळ मिळालं. बायको अडाणी, पण हुशार. ६ रुपये रोजानं कामावर जाऊ लागली. तेव्हा कुठं दोन शेर ज्वारी घरात येऊ लागली. पुस्तकांचा नाद होताच. बायको म्हणायची, पुस्तकानं पोट भरत नाही. मग मात्र अभंगला कुठलाच आधार राहिला नाही. दारिद्र्यमुक्त देशाचं स्वप्न मात्र त्यानं सोडलं नाही. बायको त्याच्या उद्ध्वस्त जगण्याला बळ देत राहिली. ग्रामीण भागातल्या या स्वप्नाळू आणि भाबड्या कार्यकर्त्याला तिनं आत्महत्या मात्र करू दिली नाही. गेली ३५ वर्षं हा फाटका माणूस सार्वजनिक कार्यात झोकून देऊन काम करतो आहे. म्हणजे काय करतो आहे, हे त्यालाही कधी कधी उमगत नाही. तो वाट चालतोच आहे. माळ मात्र सरत नाही. पण त्यानं मैदान सोडलेलं नाही. कोणत्याही सामाजिक किंवा काय म्हणतात त्या कृतज्ञता निधीला अभंग अजून गवसलेला नाही. तरीपण पठ्ठ्याचं आत्मबळ दांडगं आहे. व्यवस्थेनं त्याच्या दारिद्र्यमुक्तीच्या स्वप्नाची केव्हाच वाट लावून टाकली. आणि आता तर फ्रस्ट्रेट होऊन कालच अभंग मला म्हणाला... सबसे खतरनाक है सपनोंका मर जाना...!
९८५०३०४२८९(लेखक ‘दै.पुण्यनगरी’च्या लातूर आवृत्तीचे वरिष्ठ वृत्तसंपादक आहेत.)

Comments
Post a Comment